কাণৰ বিষৰ পৰা সকাহ পোৱাৰ কেইটামান গুৰুত্বপূৰ্ণ ঘৰুৱা উপায়.
अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
- विद्यार्थ्यांना घेतली रॅगिंग प्रतिबंधक शपथ
-विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी रॅगिंग प्रतिबंधक शपथ घेतली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १२ ऑगस्ट हा दिवस अँटी रॅगिंग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
News video | 10 views
गदाना येथे रस्ता रोको आंदोलन
तीन तास खुलताबाद फुलंब्री रोड वरील वाहतूक ठप्प
खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे सोमवारी १२ मुख्य रस्त्याला जंक्शन रोड जोडण्याच्या मागणीसाठी सकाळी तीन तास रास्ता आंदोलन करण्यात आले. खुलताबाद - फुलंब्री
रोड वरील राज्य रस्ता क्रमांक ७५२ चे गेल्या तीन वर्षांत सिमेटीकरण रोड चे काम झाले आहे, यात गदाना गावातली बसस्टँड परिसरातून गावात व जिल्हा परीषद शाळा,किशोर नगर, बोरवाडी गावाकडे, न्यू हायस्कूल शाळेकडे,श्री चक्रधर स्वामी मंदीर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अहिल्यादेवी नगर, अंगणवाडी क्रमांक पाच पासून ममानापुर कडे आदी ठिकाणी येथूनच रस्ता जातो. याचं रस्त्याला मुख्य सिमेंट रस्त्यापासून डांबरी कारण करून व रस्त्याच्या दोन्हीं बाजूने नाली करुण पाणी काढून देण्याची मागणी निवेदनातून कऱण्यात आली आहे.
खुलताबादेतील बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता , तहसील कार्यालय, पोलिक ठाणे, पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले आहे.
गदाना येथे रस्ता रोको आंदोलन
News video | 9 views
ट्रॉनऍनिमेशन तर्फे शहरात मिनि मॅरेथॉनचे आयोजन... 100 धावपटूंनी घेतला सहभाग...
छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित ट्रॉनऍनिमेशन यांच्या कडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन मनपाचे रवींद्र जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले पहाटे 6 वाजता झुंबा या नृत्यप्रकाराने स्पर्धेची सुरुवात झाली.
ट्रॉनऍनिमेशन तर्फे शहरात मिनि मॅरेथॉनचे आयोजन... 100 धावपटूंनी घेतला सहभाग...
News video | 10 views
जालन्यातील टोल नाक्या जवळ वकिलावर बंदूक रोखल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जालना शहरातील चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागेवाडी टोल नाक्याजवळ दिनांक 9 शुक्रवार रोजी एडवोकेट सोहेल सिद्दिकी जालन्याहून औरंगाबाद संभाजीनगर कडे जात असताना 6 वाजून 27 मिनिटाच्या सुमारास दुचाकी वर असलेल्या अज्ञात तीन जणांनी पिस्तूल रोखून अडवोकेट सोहेल सिद्दिकी यांच्या गाडीचा पाठलाग केला. सदरील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून आज दिनांक 10 शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक सचिन सानप,हेड काॕन्स्टेबल प्रशांत देशमुख यांनी तात्काळ टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून 27 मिनिटाच्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये दुचाकीवरून तीन जण दिसून आले आहेत.
यावेळी अॕड सोहेल सिद्दीकी,अॕड. कामरान खान, अॕड.अकील सिद्दीकी,अॕड. शेख मुसा, अॕड.उमर परसूवाले, अॕड.आयाज सुभानी,अॕड.नोमान सिद्दिकी ई.उपस्थित होते.
जालन्यातील टोल नाक्या जवळ वकिलावर बंदूक रोखल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
News video | 8 views
छत्रपती संभाजीनगरातून महायुती फुंकणार विधानसभेचे रणशिंग
: महायुतीच्या नेत्यांच्या
मतदारसंघानुसार सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १२ तारखेला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी ११ वाजता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट यांचा मेळावा होणार आहे. यात प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होतील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरातून महायुती फुंकणार विधानसभेचे रणशिंग
News video | 9 views