CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला (NAAC) B++ मूल्यांकन

75 views

CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला ' राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ' (NAAC) B++ मूल्यांकन

कांचनवाडी, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद' (NAAC) B++ मूल्यांकन अधिस्वीकृती मिळाली आहे.
NAAC म्हणजे National Assessment and Accreditation Council ज्याला मराठी भाषेमध्ये 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद' असे म्हणतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही संस्थानांच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण मूल्यांकन आणि मान्यताची व्यवस्था करते. NAAC शैक्षणिक प्रक्रियांचे आणि त्यांच्या परिणामांचे अनुसंधान, सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या संबंधित संस्थांच्या कार्यासंबंधी गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थांना मूल्यांकन करत असते. या मूल्यांकन पद्धतीत महाविद्यालयाच्या वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम ), शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदी विविध मुद्यांचा समावेश केलेला होता. या सर्व मुद्द्यांचे मुद्देनिहाय मूल्यांकन करून सापेक्ष प्रतवारी प्रणाली (रिलेटिव्ह ग्रेडिंग सिस्टम) करून बी प्लस प्लस (B++) मूल्यांकन प्राप्त झाले आहे.
आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे व अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केल्याचे श्री पद्माकरराव मुळे यांनी सांगितले.
‘नॅक’ अधिस्वीकृतीमुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, या पुढील काळात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्य.

You may also like

Sports Video

Commedy Video